सेवानिवृत्ती समारंभ


सेवानिवृत्ती समारंभ


लहानपणीच होती खरी
शिक्षणाची मजा रे
आमचे सर्वांचे लाडके असे
सर रवींद्र हजारे

इंग्रजी म्हटलं की
अंगावर यायचा काटा
आपणच खुल्या केल्या आम्हास
 भविष्याच्या असंख्य वाटा

मुख्याध्यापक म्हणून आज
तुम्ही होणार निवृत्त
काळीज हलून गेलं सर
ऐकून हे वृत्त

आपलीशी वाटते अजूनही सर
ही रयत शिक्षण संस्था
अजूनही कमी झाली नाही अजून
न्यू इंग्लिश स्कूल भोळीची आस्था

तुमच्या शिक्षणरूपी वल्हयाने
आयुष्याची वल्हवली होडी
अजूनही आठवते आम्हास
हातावरची निरगुडी छडी

सारंच आठवतं सर पण
बोलवत नाही आता
बघा ना थोडा संथ झालाय
हा हृदयाचा पाता

पुष्पगुच्छ तुमच्या हाती
अन टाळ्यांचा गडगडाट होईल
बघा सर आता अश्रूंनाही
कशी मोकळी वाट होईल

पुढील आयुष्यास शुभेच्छा तुम्हास
तुमचा प्रवास सुखाचा होवो
तुम्ही घडवलेला विदयार्थी सर
लाख मोलाचा होवो

तुम्ही घडवलेला विदयार्थी सर
लाख मोलाचा होवो


अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल 
खाकी वर्दीतील दर्दी कवी
💐💐💐💐💐💐

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दुनियेची रीत