स्वप्नपूर्ती
स्वप्नपूर्ती
आत्तापर्यंत जी रंगविली स्वप्ने
पूर्ण सगळी झाली
सुख आपोआपच पदरात पडले
दुःख जीवणावेगळी झाली
तो ससा प्रथम श्रेणीचा
मी झालो पारधी
अंगात हवी होती वर्दी
अन बायको हमदर्दी
जरी स्वप्नांची धाव
क्षितिजाअंती होती
सरड्याची धाव कुपणापर्यंत
याची प्रचिती होती
कशी सांगू वेदना मनाची
थेंब थेंब गाळलेल्या त्या घामाची
अशी कृपा लाभली ईश्वराची
कुंपणच विसरले मर्यादा बंधनाची
ती बंधने तोडून धाव मग
क्षितिजाअंती गेली
गरुडाच्या पंखांची मग
स्वप्नांना गती आली
ग्रॅज्युएशन ला प्रथम श्रेणी घेतली
अंगात मग वर्दी घातली
बायको स्वप्नाहूनही सुंदर भेटली
मग स्वप्ने सारी आपलीच वाटली
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8434043233
दिनांक 09/01/2009
सोमवार
टिप्पण्या