मझ्याच नशिबी यावे हे असेच का रे......
असेच का रे
तुझ्या कुशीतच माझे
फुलती सुख पिसारे
सारे इथेच आहे
जशेच्या तसे
तुझा विरह म्हणजे
जणू काटेरी फासे
या काटेरी फास्यांचे
होतील का तारे
माझ्याच नशिबी यावे हे
असेच का रे.......
फडफड करते आज
माझी डावी पापणी
नकळत ये तू असा
माझ्याच स्वप्नी
लाभुदे स्वप्नांना
थंड गुलाबी वारे
माझ्याच नशिबी यावे
असेच का रे.......
क्षणभराचा तुझा सहवास
बाकी सारे धुके
फुल उमलते मनी आशेचे
ते ही असते मुके
मुक्या या फुलांना
शब्द फुटू दे रे..
माझ्याच नशिबी यावे हे
असेच का रे.......
सैरभैर माझी नजर
तुलाच शोधितसे
पायाखाली जमीन ना
असेच भासतसे
भास नाही हे
सत्य आहे रे
माझ्याच नशिबी यावे हे
असेच का रे.......
किती पहावी वाट तुझी
माझे न मला भान
माझ्या मनी उमटूदे
भेटीची सप्तरंगी कमान
पाऊस होऊन असा
बेभाम पडशील का रे
माझ्या नशिबी यावे हे
असेच का रे.......
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल )
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो.8424043233
टिप्पण्या