माय मराठी




माय मराठी

ही माती मराठी
ही नाती मराठी
विश्वात ही गुंजते
ही ख्याती मराठी

ही नाळ मराठी
ही बाळ मराठी
अस्मानीही झेंडा रोवतो
हा काळ मराठी

हा साद मराठी
हा नाद मराठी
ही मादक रसाळ
स्वाद मराठी

ही माय मराठी
ही ताय मराठी
स्पंदनातूनही उतू जाते
ही साय मराठी

ही जान मराठी
हे ज्ञान मराठी
विश्वातही हिला
असा मान मराठी

ही ओढ मराठी
ही खोड मराठी
अमृताहून ही अशी
 माझी गोड मराठी

अजय दत्तात्रय चव्हाण
*खाकी वर्दीतला दर्दी कवी*
मोबाईल नंबर
8424043233

टिप्पण्या

Priyanka kadam म्हणाले…
मस्तच जय शिवराय
Unknown म्हणाले…
मी मराठी आम्ही मराठी आपण मराठी वाह खूप छान कल्पना आहे कवी राज

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत