Valentine's Day Special Poem
Valentine's Day Special Poem
वाटले मनास सहजच
थोडं वेगळं करून पाहूया
आजपर्यंत जिंकतच आलो प्रेम
आज थोडंस हरुन पाहूया
सर्वचजण धरपडतात
प्रेयसीचं प्रेम जिंकण्यासाठी
जी मनात दडवली इच्छा
ती बोलून दाखवण्यासाठी
अस प्रत्येकालाच वाटत
आपण I Love You बोलावं
तिनं थरथरत्या ओठांन
नकळत हो म्हणावं
लडिवाळपणे हळूच म्हणावं तिला
माज्याहुनही जास्त तूच प्रेम करतेस
मी हरलो प्रीतीपुढे तुझ्या
तूच अजिंक्य ठरतेस
कधी मी कधी तिनं
प्रकट केलं प्रेम
दोघांनीही जीवापाड
सरसकट केलं प्रेम
शब्दरचना
✍✍✍✍✍
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233
टिप्पण्या