*द्रौपदी ला वस्त्र पुरविणारा* *सांगा कुठे लपलाय कृष्ण*




*द्रौपदी ला वस्त्र पुरविणारा*
*सांगा कुठे लपलाय कृष्ण*


मनात सारखा रेंगाळतोय हा
हृदयास हेलावणारा प्रश्न
द्रौपदी ला वस्त्र पुरविणारा
सांगा कुठे लपलाय कृष्ण

कोवळ्या जीवाची लक्तरे ते
एखाद्या पशु प्रमाणे तोडतात 
सांगा ना माणूस म्हणून नक्की
ते कोणत्या संज्ञेत मोडतात

नुसती बातमी वाचली तरी
चटकन अंगावर येतो काटा
आक्रोश एवढ्याश्या जीवाचा
संथ होतात ना हृदयाच्या लाटा

स्त्री जन्म घेतला म्हणून तिने
कठोर गुन्हा केलाय का
दगडातच असतो देव म्हणे
मग माणसातला मेलाय का

का कीव वाटत नाही त्यांना
एवढ्याश्या लहानग्या जीवाची
पुन्हा का वाटावी गरज आम्हा
त्या जिजाऊच्या शिवाची

कोपर्डी, निर्भया, असिफा 
उद्या आणखी कोणी असेल
हृदयातून पाझरणारं सांगा
माणूसपण कुठे दिसेल 

हृदयातून पाझरणारं सांगा
माणूसपण कुठे दिसेल

✍✍✍✍
शब्दरचना 
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत