असे काही ठराविकच आहेत लोक ज्यांना माझ्या कवितेचा आहे शोक तुम्ही कितीही असला जरी घाईत Like करताना तुमचे हात कधीच थकत नाहीत तुमच्या कॉमेंट मित्रांनो खूपच असतात सुंदर म्हणूनच जपतो त्यांना मी माझ्या ह्रयद्याच्या अंदर तुमचे जेवढे मानावेत आभार तेवढे कमी आहे माझ्या कविता आवडतात तुम्हाला तेवढी हमी आहे तुमचे प्रेम आणि प्रतिसाद पाहून भारून जात मन तुमच्या या अपुलकीपुढे हारून जात मन तुमची अपुलकीच मला आणखी लिहायला देते बळ नाहीतर कुठवर सोसली असती मी हृदयाच्या वेदनांची कळ अजय द चव्हाण उर्फ राहुल खाकी वर्दीतील दर्दी कवी *सर्व माझ्या प्रत्येक कवितेला आवडीने like व दाद देणाऱ्या माझ्या लाडक्या मित्रांना समर्पित*
पोस्ट्स
मे, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
शांत सागर होऊन मित्रांचं हृदय जिंकावं आपलं मन मारून त्यांचं मन राखावं हाकेला द्यावी हाक अन अडचणीत द्यावा हात पाहावं हसऱ्या नजरेत त्याच्याच सुखात न्हात मौज मस्ती हसणं खेळणं आयुष्य भरभरून जगावं आपली झोळी पसरून सुख त्याच्यासाठी मागावं रक्ताचं नातं नसलं तरी रक्तात सळसळते मैत्री रखरखत्या उन्हात सुखावणारी गाढ सावली बनते मैत्री निभावली जर अंतकरणातुन एक महासागर आहे मैत्री नाहीतर प्रवाहासोबत वाहणारी रिकामी घागर आहे मैत्री अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ राहुल खाकी वर्दीतील दर्दी कवी