असे काही ठराविकच
आहेत लोक
ज्यांना माझ्या कवितेचा
आहे शोक

तुम्ही कितीही असला
जरी घाईत
Like करताना तुमचे हात
कधीच थकत नाहीत

तुमच्या कॉमेंट मित्रांनो
खूपच असतात सुंदर
म्हणूनच जपतो त्यांना
मी माझ्या ह्रयद्याच्या अंदर

तुमचे जेवढे मानावेत आभार
तेवढे कमी आहे
माझ्या कविता आवडतात तुम्हाला
तेवढी हमी आहे

तुमचे प्रेम आणि प्रतिसाद पाहून
भारून जात मन
तुमच्या या अपुलकीपुढे
हारून जात मन

तुमची अपुलकीच मला
आणखी लिहायला देते बळ
नाहीतर कुठवर सोसली असती मी
हृदयाच्या वेदनांची कळ

अजय द चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी

*सर्व माझ्या प्रत्येक कवितेला आवडीने like व दाद देणाऱ्या माझ्या लाडक्या मित्रांना समर्पित*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत