शांत सागर होऊन
मित्रांचं हृदय जिंकावं
आपलं मन मारून
त्यांचं मन राखावं

हाकेला द्यावी हाक अन
अडचणीत द्यावा हात
पाहावं हसऱ्या नजरेत
त्याच्याच सुखात न्हात

मौज मस्ती हसणं खेळणं
आयुष्य भरभरून जगावं
आपली झोळी पसरून
सुख त्याच्यासाठी मागावं

रक्ताचं नातं नसलं तरी
रक्तात सळसळते मैत्री
रखरखत्या उन्हात सुखावणारी
गाढ सावली बनते मैत्री

निभावली जर अंतकरणातुन
एक महासागर आहे मैत्री
नाहीतर प्रवाहासोबत वाहणारी
रिकामी घागर आहे मैत्री


अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत