हात उसणे...




*हात उसणे*


वाचता वाचता कविता माझी
आवरा जरा हसणे
तुम्ही सुद्धा कुणालातरी
पैसे दिले असतीलच ना उसणे

आपलेच पैसे असून पण
भिकाऱ्यासारखे मागावे लागतात
गरजेला मदत करून पण
लोक असे का वागतात

पैसे घेताना मात्र 
चेहरे त्यांचे केविलवाणे
नंतर मात्र सुरू होते 
मग नेहमीचेच रडगाणे

अडचणी कुणाला नसतात हो
पण देणारा मूर्ख असतो
जीवापाड जपलेल्या नात्याचा
तो दळवळणारा अर्क असतो

म्हणूनच तर मित्रांनो ही 
जगभर आहे ख्याती
पैश्यानेच तर खरी
तुटली जातात नाती

माझी कविता वाचून मग
भल्या भल्यांना येईल राग
असुद्या त्या निमित्ताने तरी
त्यांना येईल जराशी जाग

कवितेत नावे टाकावीत त्यांची
हा विचार होता मणी 
नातं तर टिकवायचंच आहे
मात्र दुखावू नये कुणी.....

अजय द.चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो. 8424043233

टिप्पण्या

Struggler Guru म्हणाले…
अप्रतिम रचना गुरुजी..
जळजळीत सत्य मांडलय तुम्ही यातून
👏👏👏👏🙏
Unknown म्हणाले…
तेवडाय त्याची वेळ निघते पण परत तो आपल्या वेळेला देत नाय
Unknown म्हणाले…
वास्तव मांडले साहेब तुम्ही कवितेतून
Tushar Kasure म्हणाले…
मानलं राव तुम्हाला👌👌👌👌🙏
Unknown म्हणाले…
खूप छान पण सत्य आहे
Unknown म्हणाले…
गुरूजी!पद्यरूपी वर्मी घाव् आहे हा!कटुसत्य

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत