बायकोस काळजी रं माझ्या बायकोस काळजी रं...
बायकोस काळजी रे माझ्या
बायकोस काळजी रे..
सकाळी उठून
चपाती लाटून
पोरांना खायाला देई
आवरून पोरांचं
धुणं जोरचं
पटपट धुऊन घेई
देईल उभारी
म्हणून कारभारी
साथ तू सोडू नको
तिच्या हाती ना अराम कुठं
गोड चहातली ती वेलची रे....
बायकोस काळजी रे माझ्या
बायकोस काळजी रे...
सोबती रे ती तुझ्याच
अन तुला तिचीच साथ
शोधूनी मिळेल का अशी बायको
घेऊदे जरा मिठीत
धरतोस का वेठीस
राग सोडुनी खुश होई रे पुन्हा
बायकोस काळजी रे माझ्या
बायकोस काळजी रे...
आपल्या संसारी जिद्दीनं लढते
रोजचा तिचा तमाशा
प्रेम गाठीला संसार पाठीला
अशी रं भेटली मला
रोजचं कुढणं नशिबाला
अराम न तिच्या जीवाला
बघून हसेल
मनात बसेल
प्रेम नाकारू नको
होईल संसार
सुखाचा असा रं
तिच्याव चिडू नको
उगाच मारून द्वेष पेरून
उगाच बोलू नको
श्वास आहे ती या मनाचा
गोड चहातली ती वेलची रं..
बायकोस काळजी रं माझ्या
बायकोस काळजी रं...
शब्दरचना
✍✍✍✍✍✍
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल)
*खाकी वर्दीतील दर्दी कवी*
मोबाइल नंबर ८४२४०४३२३३
टिप्पण्या
It's real.
Khupch chhan👌👌👌
Quality wala aadmi, aaj ke jamane me itna achha bin paise ka kuch nhi milta, pn te with bhette