शब्द आणि मी



*शब्द आणि मी*

शब्द माझी आवड
कविता माझा छंद
कल्पनेला नाहीत या
आकाशाचे बंध

शब्द माझी तलवार
कविता माझी ढाल 
त्यांच्यासाठीच मी
आयुष्य केलंय बहाल

शब्द माझे धन
कविता माझी संपत्ती
तेच असतील सोबतीला
जीवनाच्या अंती

शब्द माझे घर 
कविता माझा संसार
शब्दातच सामावतो
जगण्याचा सार

शब्द माझे श्वास 
कविता माझी ओढ
एक दिवस जिंकीन
रसिक मनाचा गड

शब्द माझे गुरू
कविता माझा देव
कष्टाने कमावलेली
आयुष्यभराची ठेव

✍✍✍✍✍
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो. 8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत