मरणाची कल्पना.....




*मरणाची कल्पना*

जेव्हा माझ्या देहातून
निघून जातील प्राण
माणुसकीच्या चार ओळी
तू माझ्यासाठी आण

सुरेख शब्दांनी सजवा 
माझ्या अंत यात्रेची तिरडी 
थोडीशी शिंपडा त्यावर
स्तुती सुमनांची राख करडी

नाती गोती मित्र मंडळी
सारेच असतील दिमतीला
नक्कीच दाद द्या मित्रानो
माझ्या या काव्य हिमतीला

आसवांचे पाट वाहतील
आक्रोशांचा तांडव असेल
जमीन पोरकी होईल अन
आभाळाचा मांडव असेल

चिता जळत असेल 
पण मनात नसेल चिंता
तेव्हाच खरा सुटेल सारा
या मायाजाळाचा गुंता

इतिहासाच्या पानात माझे
अस्तित्व नक्कीच असेल
गोड आठवण बनून कविता
तुमच्या गालात हसेल

भिंतीवर नसेल कदाचित फोटो
हृद्ययाजवळ राहुद्या पुस्तक
अभिमानाने नक्कीच झुकवा
माझ्या स्मृतींपुढे मस्तक

माझी कविता वाचून मित्रांनो
तुम्हाला नक्कीच येईल चीड
मरणाचीही कल्पना करणारा
कवी हाच असतो निर्भीड

मरणाचीही कल्पना करणारा
कवी हाच असतो निर्भीड....

✍✍✍✍✍
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो. 8424043233

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
खूपच छान सर
Unknown म्हणाले…
खुपच छान आहे कविता सर.पण वाचताना पापण्यांच्या कडाही आपोआप ओल्या झाल्या.🙏👍👌😔
Unknown म्हणाले…
खुपच छान आहे कविता सर.पण वाचताना पापण्यांच्या कडाही आपोआप ओल्या झाल्या.
Unknown म्हणाले…
खुपच छान आहे कविता सर.पण वाचताना पापण्यांच्या कडाही आपोआप ओल्या झाल्या.
अनामित म्हणाले…
very emotional poem ..
अनामित म्हणाले…
very emotional poem ..

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत