लग्नाचा बस्ता.......
*लग्नाचा बस्ता*
आपल्या लग्नाचा बस्ता
थोडं लाजून सामोरी बसता
गाली थोडं नकळत हासता
नयनामध्ये मूर्ती वसता
सुखावलो अंतरी
पाय सुजलेला
मन ओसरलेले
तुझ्याशी बोलण्यास
ओठ अतुरलेले
मात्र तू अबोल
अन मी निशब्द
तुला पाहून मी तृप
संसाराच्या स्वप्नात मी लुप्त
म्हटलं जुळतील नवे आप्त
मात्र डिपॉझिट सुध्दा
झाले असते जप्त
चेहरा लाजेने तो चूर
अडखळला ओठातील सूर
तुझ्या मनाची ती हुरहूर
जाणली प्रथमी मी पुरेपूर
तुझी नजर माझ्यावर
माझी नजर आरश्यात
तू आता माझीच
मी याच भरवशात
म्हटलं वाजलं आता आपलं
बहुतेक याच वर्षात
✍✍✍✍✍
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो.8424043233
टिप्पण्या