बाळाचे सवंगडी..



*बाळाचे सवंगडी*

माझा सोनूला तुझ्या कुशीत
सूर्य आला हासत गावच्या वेशीत

बाळाच्या कानात मासोळी बाळी
त्याच्या हसण्याने उमलते कळी

किती गोंडस सुंदर बाळ
चांदमामा ने दिली तारकांची माळ

इवल्याश्या हाताची इवलीशी बोटे
बाळाशी खेळावे खारुताईला वाटे

बाळाला आवडतात सोनेरी हरणे
हिरव्या कुरणात वासराचे चरणे

त्याच गाणं पाखरांनाच कळतं
आपल्याला सुख यातूनच मिळतं

फुलांचे झुंबर नाजूक कंबर
बाळा तुझे आयुष्य वर्षे शंभर

पऱ्या आवडीने घालतात वारा
बाळाला खेळवतो निसर्ग सारा
✍✍✍✍✍
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत