माझं स्वप्न




माझं स्वप्न

एक दिवस प्रत्येक ओठांनी
गुणगुणावं माझं गाणं
तेव्हाच सार्थक होईल
या जन्मीचं माझं जिणं

उरी आहे स्वप्न
मनी आहे आशा
एक दिवस उजळतील
या ही स्वप्नांच्या दाही- दिशा

एक अशी यावी संधी
जिचं सोनं होईल
माझं गाणंही मग
प्रत्येकाचं गाणं होईल

एक दिवस माझ्या शब्दांना
मधुर सूर मिळतील
तेव्हा संगीताच्या तालावर
माझीही गाणी खेळातील

नाचताना संगीताच्या तालावर
गीतांना माझ्या ऐकत रहायचंय
जगाचंही भान हरपलेलं
या उघड्या नयनांनी पहायचंय


अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो.8424043233

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
शब्दरचना एक नंबर आहे दादा खरंच खूप खूप छान आहे
Unknown म्हणाले…
शब्दरचना एक नंबर आहे दादा खरंच खूप खूप छान आहे
Unknown म्हणाले…
शब्दरचना खतरनाक आहे दादा खूप खूप छान आहे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत