Promotion
*Promotion*
प्रत्येकालाच असते मनी
आपल्या पदोन्नतीची ओढ
खुशीत मग पदोन्नतीच्या
मित्रांचे तोंड करतो गोड
पदोन्नती म्हणजे नोकरीतील
एक मैलाचा दगड
जस काय आपण एखादा
जिंकून आलोय गड
गरम कपातला चहा जसा
हळूच ओतावा बशीत
आनंदाला नसतो पारावार
अन आपण असतो खुशीत
गाळलेल्या घामाचं मग
हे चीज होतं असं
सुरवंट्याचं सुरेख हे
फुलपाखरू होतं जसं
जशी मिळते पदोन्नती
तशी जबाबदारी ही वाढते
सक्षम बनविण्या स्वतःला
आपले मन मनाशी लढते
वरिष्ठांकडून होतो सत्कार अन
सहकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आनंदाच्या सरीत भिजून जातो
हा पोलीस नावाचा गाव
आनंदाच्या सरीत भिजून जातो
हा पोलीस नावाचा गाव
✍✍✍✍✍✍
शब्दरचना
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो.8424043233
टिप्पण्या