पोस्ट्स

ऑगस्ट, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आहे श्रद्धा माझी....

इमेज
*आहे श्रद्धा माझी...* आहे श्रद्धा माझी... मनात माणुसकी जपणाऱ्या साऱ्यांवर सीमेवर प्राणपणाने लढणाऱ्या जिगरबाज वीरांवर  आहे श्रद्धा माझी... जन्मदात्या आई वडिलांवर जीव ही ओवाळून टाकावा त्यांच्या एका शब्दावर श्रद्धा आहे माझी... जात, धर्म,पंत बाजूला ठेऊन संकटात धावणाऱ्या माणसांवर शेतकऱ्यांच्या घामातून पिकलेल्या काळ्या मातीतील कणसांवर  आहे अपार श्रद्धा माझी देशासाठी त्याग बलिदान प्रसंगी प्राणांची आहुती दिलेल्या शूरवीरांवर आपल्यासाठी काळजात सदैव प्रेम आपुलकी ठेवणाऱ्यांवर आहे श्रद्धा माझी... माणसाला माणूस म्हणून जगता यावं यासाठी जीवाचं रान केलेल्या समाजसुधारकांवर राष्ट्रभक्ती अन देशप्रेमाने फ़डफडणाऱ्या तिरंग्याच्या चाकावर खरंच आहे श्रद्धा माझी मनात माणुसकीच बीज रुजवणाऱ्या प्रत्येक हृदयावर निसर्गातील प्रत्येक घडामोडीच्या उदयावर आहे अढळ श्रद्धा माझी.. आपलं जीवन सुखकर बनविणाऱ्या विज्ञानावर ज्याने विजय मिळवला बुरसटलेल्या अज्ञानावर आहेच श्रद्धा माझी मी रोज घेत असलेल्या श्वासावर जीवापाड जपत अ...

समाजसुधारक

इमेज
*समाजसुधारक* इथे एक शब्द बोललो तर लोकं मला खायला उठतात कसा घडवला असेल समाज त्यांनी असे प्रश्न मला सारखे पडतात वारंवार लोकांनी त्यांची उडवून देखील खिल्ली माणूस म्हणून जगण्याची  त्यांनीच दिली  गुरूकिल्ली शिक्षणाचा अधिकार ही तेव्हा नव्हताच कधी मुलींना किती मरण यातना सहन केल्या बद्दलण्या दुष्ट चालींना शाळेत जाताना जेव्हा पाहतो हसती खेळती मुले आठवतात तेव्हा मला  त्या सावित्रीबाई फुले स्पृश्य अस्पृश्य असा  ज्यांनी भेद केला नष्ट लिहण्या संविधान आंबेडकरांनी दिवस रात्र केले कष्ट समाजाच्या भल्यासाठीच सळसळले महात्मा फुले शाहूंचेही रक्त गुलामगिरीच्या जाचातून त्यांनी माणूस केलाच ना  मुक्त माणूसच माणसाशी जिथे माणूस म्हणून नाही वागला घडविण्या समाज हा मग प्रसंगी धर्म ही त्यांनी त्यागला प्रत्येकालाच असावा त्यांच्या संघर्ष अन त्यागाचा अभिमान हृदयात नेहमीच जपतो मी ही समाजसुधारकांबद्दल सन्मान ✍✍✍✍✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो.8424043233

जखम ती जिव्हारी

इमेज
जखम ती जिव्हारी  जगाच्या कानोड्यात त्यांचं सोनेरी घरटं सुख त्यांच्या अंगणात जणू पाणी भरतं घरोघरी असतात म्हणे मातीच्याच चुली त्यांच्या पोटी जन्मल्या मात्र चारही मुली मुलासाठी त्यांच खूप तडफडलं मन मुली म्हणजे मात्र  परक्या घरचं धन त्यांनाही ठाऊक होतं ती कधीच नाहीत आपली तरीही तळहातावरील फोडाप्रमाणे पिल्ले त्यांनी जपली मुलगी वयात आली की काळजी त्यांना वाटे त्यांच्या सुखासाठी नयनी पाणी दाटे हर एकीला त्यांनी  संसार थाटून दिला मनासारखा पती  त्यांना गाठून दिला मुलींचे संसार फुलले त्यांनाही मुले झाली डबडबल्या डोळ्यात  अश्रूंची फुले झाली संसार मुलींचे फुलवून  आईची झाली आजी आता आयुष्यभर वाहतील ते एकलेपणाचीच ओझी घरट्यातून पिले आता उडून गेली सारी हृदयात फक्त सलणारी जखम ती जिव्हारी हृदयात फक्त सलणारी जखम ती जिव्हारी ✍✍✍✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो.8424043233

पाऊस

इमेज
या सिझन मधील लिहलेली ही पावसावरील कविता वाचून नक्कीच आपलं मन आनंदून जाईल........👌 *पाऊस आला की* खरंच पाऊस आला की मनसोक्त भिजतो का आपण का कडी लावून दाराची मग घरात गुपचूप निजतो आपण पाऊस आला की आपण आडोसा धरतो चटकन छत्री असो की रेनकोट उघडतोच ना पटकन रिमझिम पावसाच्या सरी झेलत आजकाल नाचत नाही कुणी पावसाच्या गोड आठवणी त्या  फक्त आठवत असतात मनी हे जरी तितकंच खरं असलं पावसात भिजायला वाटतं मस्त मात्र डोकं भिजेल सर्दी होईल याकडेच मात्र लक्ष असतं जास्त म्हटलं नाचणाऱ्या थेंबासोबत खावीत गरमागरम भजी पावसात भिजायला सांगा ती तरी कुठे असतेे राजी तिला छत्रीत घ्यावं असं सांगा कुणास वाटत नाही ते आभाळ सुद्धा आता पहिल्यासारख दाटत नाही ✍✍✍✍✍✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो. 8424043233

माझी प्रीत

इमेज