समाजसुधारक
*समाजसुधारक*
इथे एक शब्द बोललो तर
लोकं मला खायला उठतात
कसा घडवला असेल समाज त्यांनी
असे प्रश्न मला सारखे पडतात
वारंवार लोकांनी त्यांची
उडवून देखील खिल्ली
माणूस म्हणून जगण्याची
त्यांनीच दिली गुरूकिल्ली
शिक्षणाचा अधिकार ही तेव्हा
नव्हताच कधी मुलींना
किती मरण यातना सहन केल्या
बद्दलण्या दुष्ट चालींना
शाळेत जाताना जेव्हा
पाहतो हसती खेळती मुले
आठवतात तेव्हा मला
त्या सावित्रीबाई फुले
स्पृश्य अस्पृश्य असा
ज्यांनी भेद केला नष्ट
लिहण्या संविधान आंबेडकरांनी
दिवस रात्र केले कष्ट
समाजाच्या भल्यासाठीच सळसळले
महात्मा फुले शाहूंचेही रक्त
गुलामगिरीच्या जाचातून त्यांनी
माणूस केलाच ना मुक्त
माणूसच माणसाशी जिथे
माणूस म्हणून नाही वागला
घडविण्या समाज हा मग
प्रसंगी धर्म ही त्यांनी त्यागला
प्रत्येकालाच असावा त्यांच्या
संघर्ष अन त्यागाचा अभिमान
हृदयात नेहमीच जपतो मी ही
समाजसुधारकांबद्दल सन्मान
✍✍✍✍✍✍✍✍
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो.8424043233
टिप्पण्या