जखम ती जिव्हारी



जखम ती जिव्हारी 

जगाच्या कानोड्यात
त्यांचं सोनेरी घरटं
सुख त्यांच्या अंगणात
जणू पाणी भरतं

घरोघरी असतात म्हणे
मातीच्याच चुली
त्यांच्या पोटी जन्मल्या मात्र
चारही मुली

मुलासाठी त्यांच खूप
तडफडलं मन
मुली म्हणजे मात्र 
परक्या घरचं धन

त्यांनाही ठाऊक होतं
ती कधीच नाहीत आपली
तरीही तळहातावरील फोडाप्रमाणे
पिल्ले त्यांनी जपली

मुलगी वयात आली की
काळजी त्यांना वाटे
त्यांच्या सुखासाठी
नयनी पाणी दाटे

हर एकीला त्यांनी 
संसार थाटून दिला
मनासारखा पती 
त्यांना गाठून दिला

मुलींचे संसार फुलले
त्यांनाही मुले झाली
डबडबल्या डोळ्यात 
अश्रूंची फुले झाली

संसार मुलींचे फुलवून 
आईची झाली आजी
आता आयुष्यभर वाहतील ते
एकलेपणाचीच ओझी

घरट्यातून पिले आता
उडून गेली सारी
हृदयात फक्त सलणारी
जखम ती जिव्हारी

हृदयात फक्त सलणारी
जखम ती जिव्हारी
✍✍✍✍✍✍✍
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो.8424043233

टिप्पण्या

Sagar Kanse म्हणाले…
खुप छान सर

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत