पाऊस
या सिझन मधील लिहलेली ही पावसावरील कविता वाचून नक्कीच आपलं मन आनंदून जाईल........👌
*पाऊस आला की*
खरंच पाऊस आला की
मनसोक्त भिजतो का आपण
का कडी लावून दाराची मग
घरात गुपचूप निजतो आपण
पाऊस आला की आपण
आडोसा धरतो चटकन
छत्री असो की रेनकोट
उघडतोच ना पटकन
रिमझिम पावसाच्या सरी झेलत
आजकाल नाचत नाही कुणी
पावसाच्या गोड आठवणी त्या
फक्त आठवत असतात मनी
हे जरी तितकंच खरं असलं
पावसात भिजायला वाटतं मस्त
मात्र डोकं भिजेल सर्दी होईल
याकडेच मात्र लक्ष असतं जास्त
म्हटलं नाचणाऱ्या थेंबासोबत
खावीत गरमागरम भजी
पावसात भिजायला सांगा
ती तरी कुठे असतेे राजी
तिला छत्रीत घ्यावं असं
सांगा कुणास वाटत नाही
ते आभाळ सुद्धा आता
पहिल्यासारख दाटत नाही
✍✍✍✍✍✍✍✍✍
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो. 8424043233
टिप्पण्या
सर