आहे श्रद्धा माझी....



*आहे श्रद्धा माझी...*

आहे श्रद्धा माझी...
मनात माणुसकी जपणाऱ्या साऱ्यांवर
सीमेवर प्राणपणाने लढणाऱ्या
जिगरबाज वीरांवर 

आहे श्रद्धा माझी...
जन्मदात्या आई वडिलांवर
जीव ही ओवाळून टाकावा
त्यांच्या एका शब्दावर

श्रद्धा आहे माझी...
जात, धर्म,पंत बाजूला ठेऊन
संकटात धावणाऱ्या माणसांवर
शेतकऱ्यांच्या घामातून पिकलेल्या
काळ्या मातीतील कणसांवर 

आहे अपार श्रद्धा माझी
देशासाठी त्याग बलिदान
प्रसंगी प्राणांची आहुती दिलेल्या
शूरवीरांवर
आपल्यासाठी काळजात सदैव
प्रेम आपुलकी ठेवणाऱ्यांवर

आहे श्रद्धा माझी...
माणसाला माणूस म्हणून जगता यावं
यासाठी जीवाचं रान केलेल्या
समाजसुधारकांवर
राष्ट्रभक्ती अन देशप्रेमाने फ़डफडणाऱ्या
तिरंग्याच्या चाकावर

खरंच आहे श्रद्धा माझी
मनात माणुसकीच बीज
रुजवणाऱ्या
प्रत्येक हृदयावर
निसर्गातील प्रत्येक घडामोडीच्या
उदयावर

आहे अढळ श्रद्धा माझी..
आपलं जीवन सुखकर बनविणाऱ्या
विज्ञानावर
ज्याने विजय मिळवला
बुरसटलेल्या अज्ञानावर

आहेच श्रद्धा माझी
मी रोज घेत असलेल्या श्वासावर
जीवापाड जपत असलेल्या
या अंतःकरणातील ध्यासावर..

✍✍✍✍✍✍✍✍✍
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो.8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत