चंद्रयान 2...
*दर्दी कवीच्या लेखणीतून.... ✍*
*चंद्रयान 2*
ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होऊ
देशाने स्वप्न बाळगले उराशी
श्वास थांबला नजरा रोखल्या
त्या टाळ्याही थंडावल्या जराशी
यशस्वीरीत्या पूर्ण केला त्याने
लाखो किलोमीटरचा प्रवास
एका क्षणासाठी थांबलाच ना
करोडो भारतीयांचा श्वास
पाऊल ठेवणारच चंद्रावर तेवढ्यात
विक्रमचा संपर्क लागला घसरू
देशप्रेम आहे हृदयात म्हटल्यावर
डोळ्यातून ओघळणारच ना अश्रू
डोळे पाणावले अक्षरशः
बांध ही फुटला अश्रूचा
प्रत्येक भारतीयास आज
अभिमान वाटतो इस्त्रोचा
सम्पर्क तुटला जरी लँडरचा
शास्त्रज्ञांची जिद्द नाही तुटली
करावया फत्ते मोहीम चंद्रयान
पुन्हा आग या उरात पेटली
पुन्हा आग या उरात पेटली
✍✍✍✍✍✍✍
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो.8424043233
टिप्पण्या
Salute isro