पोस्ट्स

मार्च, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लढा कोरोनाविरुद्धचा

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दर्दी कवीची भारतवासीयांना या कवितेमधून कळकळीची विनंती.... *आवडल्यास शेयर करायला मात्र विसरू नका....* *लढा कोरोनाविरुद्धचा* टाळी वाजवून झाली वाजवून झाली थाळी खचून नका जाऊ भावांनो अश्या बिकट प्रसंगावेळी मारलाय जरी कोरोनाने जगास विषारी डंख आताच खरा लढाईचा हा फुंकला गेला शंख लढाई मैदानात नाही ही आपल्या घरातुन आहे ही कळकळीची विनंती दर्दी कवीच्या उरातून आहे लॉकडाउन झाली शहरे लागू झाली जमाव बंदी कोरोना हद्दपार करण्याची हीच खरी नामी संधी तोंडपाठ करून ठेवा तुम्ही  सरकारी सूचनांचा पाढा आणि यशस्वी करूनच दाखवू हा कोरोना विरुद्धचा लढा ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो.8424043233

चिमुकल्यांची अवस्था

इमेज
चिमुकल्यांची अवस्था भिरभिर त्यांची नजर शोधतेय बाहेरची वाट पाहून त्यांची तळमळ भिजतो डोळ्यांचा काठ मुक्त विहारणारी पाखरं आज कैद झालेत घरात आम्हालाही बाहेर जायचंय बोलतायत एका सुरात एक वायरस काय आला सारा आनंद घेतला हिरावून पाहून सारखं डोळ्यासमोर त्यांना आपलंच मन जातंय भारावून ना गार्डन ना अंगण  गप्प घरातच बसायचं ओरडा आपण दिला की कोपऱ्यात रुसून बसायचं त्यांना ही कळतंय आता आपण घरातच बसायचं  पाहून त्यांच्या मनाची अवस्था मग खोटं खोटं हसायचं शाळेचा ड्रेस ही बघा ना  त्यांच्या अंगावर नाही चढत लवकर यशस्वी होवो ही कोरोनाविरुद्धची लढत ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो.8424043233

*व्यथा कोरोना वायरस पीडिताची*

इमेज
कोरोना बाधित इसमाची व्यथा दर्दी कवीने आपल्या या काव्यातून मांडली आहे.. *व्यथा कोरोना वायरस पीडिताची* दोष काहीच नाही माझा  तरीही मी कोरोना बाधित आहे बघा ना माझे नाव आता त्या  मरणारांच्या यादीत आहे आयुष्यभर कुरवळणारी माणसे आता लागलेत दूर पळू शेवटी कोणीच नसत कुणाचं हेच लागले मनास कळू माझ्याही मनास वाटतं खूप भरभरून जगावं अजून थोडं आयुष्य त्या देवास मागावं मात्र कोणताच देव आता  मला येणार नाही वाचवायला आंतरिक बळच लागतं हो हे असलं दुःख पचवायला मंदिरे सारी ओस पडली मस्जिद ही झाल्या खाली विश्वास तारणारा आज  बघा उघड्यावर पडला वाली कोणताच भगवंत नाही तर  मला विज्ञानच यातून तारेल बघा नक्कीच माझं आयुष्य  पुन्हा आणखी आनंदाने भरेल पुन्हा आणखी आनंदाने भरेल ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो.8424043233

चाइना से आया है कोरोना लेकिन इतना भी मत डरो ना

इमेज
चाइना से आया है कोरोना लेकिन इतना भी मत डरो ना सुरक्षा ही उपाय है  डॉक्टर भी कह गए अब बिना हात धोए अपने मुंह नाक को न छुए                               जरूर निकलेगा कोई उपाय                                      जिंदगी से ऐसे मुह मत फेरो ना...                                 चाइना से आया है कोरोना                                   लेकिन इतना भी मत डरो ना सास लेने में अगर आपको होगी कोई भी परेशानी डॉक्टर की सलाह लेना  तो जरूर होगी आसानी                          सिर्फ डर ही नहीं यारों                   ...