चिमुकल्यांची अवस्था
चिमुकल्यांची अवस्था
भिरभिर त्यांची नजर
शोधतेय बाहेरची वाट
पाहून त्यांची तळमळ
भिजतो डोळ्यांचा काठ
मुक्त विहारणारी पाखरं
आज कैद झालेत घरात
आम्हालाही बाहेर जायचंय
बोलतायत एका सुरात
एक वायरस काय आला
सारा आनंद घेतला हिरावून
पाहून सारखं डोळ्यासमोर त्यांना
आपलंच मन जातंय भारावून
ना गार्डन ना अंगण
गप्प घरातच बसायचं
ओरडा आपण दिला की
कोपऱ्यात रुसून बसायचं
त्यांना ही कळतंय आता
आपण घरातच बसायचं
पाहून त्यांच्या मनाची अवस्था
मग खोटं खोटं हसायचं
शाळेचा ड्रेस ही बघा ना
त्यांच्या अंगावर नाही चढत
लवकर यशस्वी होवो ही
कोरोनाविरुद्धची लढत
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो.8424043233
टिप्पण्या