लढा कोरोनाविरुद्धचा

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दर्दी कवीची भारतवासीयांना या कवितेमधून कळकळीची विनंती....

*आवडल्यास शेयर करायला मात्र विसरू नका....*

*लढा कोरोनाविरुद्धचा*

टाळी वाजवून झाली
वाजवून झाली थाळी
खचून नका जाऊ भावांनो
अश्या बिकट प्रसंगावेळी

मारलाय जरी कोरोनाने
जगास विषारी डंख
आताच खरा लढाईचा
हा फुंकला गेला शंख

लढाई मैदानात नाही ही
आपल्या घरातुन आहे
ही कळकळीची विनंती
दर्दी कवीच्या उरातून आहे

लॉकडाउन झाली शहरे
लागू झाली जमाव बंदी
कोरोना हद्दपार करण्याची
हीच खरी नामी संधी

तोंडपाठ करून ठेवा तुम्ही
 सरकारी सूचनांचा पाढा
आणि यशस्वी करूनच दाखवू
हा कोरोना विरुद्धचा लढा
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो.8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत