*व्यथा कोरोना वायरस पीडिताची*
कोरोना बाधित इसमाची व्यथा दर्दी कवीने आपल्या या काव्यातून मांडली आहे..
*व्यथा कोरोना वायरस पीडिताची*
दोष काहीच नाही माझा
तरीही मी कोरोना बाधित आहे
बघा ना माझे नाव आता त्या
मरणारांच्या यादीत आहे
आयुष्यभर कुरवळणारी माणसे
आता लागलेत दूर पळू
शेवटी कोणीच नसत कुणाचं
हेच लागले मनास कळू
माझ्याही मनास वाटतं
खूप भरभरून जगावं
अजून थोडं आयुष्य
त्या देवास मागावं
मात्र कोणताच देव आता
मला येणार नाही वाचवायला
आंतरिक बळच लागतं हो
हे असलं दुःख पचवायला
मंदिरे सारी ओस पडली
मस्जिद ही झाल्या खाली
विश्वास तारणारा आज
बघा उघड्यावर पडला वाली
कोणताच भगवंत नाही तर
मला विज्ञानच यातून तारेल
बघा नक्कीच माझं आयुष्य
पुन्हा आणखी आनंदाने भरेल
पुन्हा आणखी आनंदाने भरेल
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो.8424043233
टिप्पण्या