वास्तव
*दर्दी कवीच्या लेखणीतून...✍️*
*वास्तव*
असा कसा व्हायरस हा
पूर्ण जगावर सांडला गेला
बळजबरी माणूस बघा ना
घराघरात कोंडला गेला
ना आप्तेष्टांच्या गाठीभेटी
ना जिवलग मित्रांचा सहवास
कलियुगात भोगावा लागतोय
हा 21 दिवसाचा घरवास
लाखोंचे रोजगार थांबले
रस्ते ही झाले सामसूम
कुठेच दिसून येत नाही आता
लग्नकार्याची धामधूम
फक्त माणसंच दुरावली नाहीत
तर आनंद ही घेतला हिरावून
पाहून सध्याची अवस्था ही
खरंच मन जातंय भारावून
येउद्या कितीही मोठे संकट
आम्ही लढू अजून जोमाने
खरंच याच्या प्रभावाने
दुष्मन वागेल का प्रेमाने
अंत्ययात्रेला ही येत नाहीत
आता माणसे बघण्यासाठी
जगण्यासाठीचा संघर्ष हा
थांबला जगण्यासाठी
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
©®
मो.8424043233
टिप्पण्या