झोपलाय सारा गाव अन
झोपलाय सारा गाव
गावात काय चाललंय कुणाला न ठावं
चोर लुटारू मारतायत ताव
त्यांना सोन्या चांदीचा हाव
इथं गुन्हेगार बनतोय साव
झोपलाय सारा गाव अन
झोपलाय सारा गाव
रात्री जागत नव्हतं एक बी कुत्रं
आणि होतं ते भी मरणाचं भित्र
अश्या या गावाचं वेगळंच चित्र
वैऱ्याप्रमाणे वागत होते जिवलग मित्र
हे मित्र जोडायला सांगा कुठे जावं
झोपलाय सारा गाव अन
झोपलाय सारा गाव
या गावाची काय सांगावी तऱ्हा
भलताच इथे प्रत्येकाचा तोरा
कुणी इथे भाई तर कुणी इथे दादा
फक्त फसवा गाव सुधरावयाचा वादा
हा वादा पूर्ण करायला पुढं कुणी यांव
झोपलाय सारा गाव अन
झोपलाय सारा गाव
छान आहेत मात्र गावच्या प्रथा
एकत्र यायचे विसरून व्यथा
निवडणूका मात्र जोशात असायच्या
प्रत्येकाच्या हाती इंग्लिश दिसायच्या
कोणी जिंको कोणी हारो
यांनी मात्र मनसोक्त प्यावं
झोपलाय सारा गाव अन
झोपलाय सारा गाव
तसा हा गाव आदर्श
इथली माणसे देखील नेक
पोटात एक आणि ओठात एक
गाव एक अन भानगडी बारा
सत्याला मात्र नसायचा थारा
हा खेळ बदलायला देवा तूच आता धाव
झोपलाय सारा गाव अन
झोपलाय सारा गाव
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
टिप्पण्या
उत्तम अतिउत्तम