भाऊबीज......
*भाऊबीज*
भावाने बहिणीची
करावी रक्षा
जशी आयुष्यभराची
घेतलेली दिक्षा
बहिणीने भावाला
पंचारतीने ओवाळावे
जगातील सारे सुख
ताईला मिळावे
भावाने बहिणीचे
करावेत खूप लाड
भाऊ म्हणजे जणू
एक आनंदाचे झाड
भावाने बहिणीला
काटा टोचू देऊ नये
दुःखाची फुले कधी
तिला वेचू देऊ नये
भावाने बहिणीसाठी
शोधावे सुंदर घर
जिथं प्रेम देणारी माणसे
असतील आयुष्यभर
भावाच्या भाळी बहिणीने
लावावा केशरी गंध
पवित्र असे ते
जन्मोजन्मीचे बंध
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो:- 8424043233
भावाने बहिणीची
करावी रक्षा
जशी आयुष्यभराची
घेतलेली दिक्षा
बहिणीने भावाला
पंचारतीने ओवाळावे
जगातील सारे सुख
ताईला मिळावे
भावाने बहिणीचे
करावेत खूप लाड
भाऊ म्हणजे जणू
एक आनंदाचे झाड
भावाने बहिणीला
काटा टोचू देऊ नये
दुःखाची फुले कधी
तिला वेचू देऊ नये
भावाने बहिणीसाठी
शोधावे सुंदर घर
जिथं प्रेम देणारी माणसे
असतील आयुष्यभर
भावाच्या भाळी बहिणीने
लावावा केशरी गंध
पवित्र असे ते
जन्मोजन्मीचे बंध
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो:- 8424043233
टिप्पण्या