स्वर्गीय आर आर पाटील (आबा)....


आर.आर. पाटील (आबा)


जनसामान्यांच्या मनाचा
ज्यांनी हळूच घेतला ताबा
सर्वांचे लाडके नेते म्हणजे
आपले आर आर आबा

व्यक्तिमत्त्वच रुबाबदार अन
प्रवास त्यांचा खडतर
खरंच आबा तुम्ही आमच्यात
अजून ही असते तर

जिद्द जन्मतः अंगी होती
अन बोलण्यात परखडपणा
हालाखीच्या परिस्थितीतही
 त्यांचा ताठ पाठीचा कणा

विझली नव्हती अजून मनातून
वडिलांच्या निधनाची ज्योत
त्यांची कपडे वापरण्याविना
दुसरा नव्हता कोणता स्त्रोत

सांगली जिल्ह्यात पहिला हा
विक्रम त्यांनी मोडला
एक एक करून आपुलकीने
माणूस त्यांनी जोडला

कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर
गाजविली लोकसभा
गोरगरिबांच्या पाठीशी जणू
सह्याद्री हा उभा

पोलिसांसाठी ही लढलात तुम्ही
लाखो कुटुंबांचे केले कल्याण
आबा तुम्ही नाहीत आमच्यात तरी
आम्हास अजूनही होते तुमचे ध्यान

परिस्थितीचे चटके तुम्ही
झेलले निधड्या छातीवर
अस्तित्व अजूनही जाणवते आबा
या तासगावच्या मातीवर

आपल्यात नाहीत आता आबा
त्यांच्यावर लिहू तरी काय
हात थरथरतात माझे अन
लटलट कापतात पाय

जन जन गहिवरला अन
अश्रू तरळले डोळ्यात
खरंच हवे होते आबा तुम्ही
या सांगलीकरांच्या मळ्यात
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो:- 8424043233

टिप्पण्या

Vishal Deore म्हणाले…
विनम्र अभिवादन...🙏
Vishal Deore म्हणाले…
विनम्र अभिवादन...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत