पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Khaki varditil dard kavi

इमेज
 

भावपूर्ण श्रद्धांजली सर जी

इमेज
 गडचिरोली येथे कार्यरत असलेले महाराष्ट्राचे एक उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून नावलौकिक मिळविलेले  आदरणीय *साजिद अली खान सर यांना खाकी वर्दीतील दर्दी कवीकडून* *ही शब्दरूपी श्रद्धांजली..💐💐* *भावपूर्ण श्रद्धांजली सर जी* ज्यांच्या अचानक जाण्याने पोलीस दलास बसला धक्का साजिद खान सर म्हणजे  मैदानावरील हुकमी एक्का पोलीस पदक राष्ट्रपती पदक पदकांचा वेगळाच साज होता कालपर्यंत होते ते आपल्यात मात्र दुर्दैवी किती आज होता मॅप रिडींगचे होते त्यांना ज्ञान ही  सखोल तितकेच सोडून जाऊ नयेत अशी माणसे बस म्हणणे आहे इतकेच उत्तम प्रशिक्षक म्हणून आज त्यांची महाराष्ट्रभर ख्याती आहे काय सांगू उरात आमच्या आज दुःख साचले किती आहे आसवांनी द्यावी सलामी अन हृदयाचा व्हावा तिरंगा  पुन्हा येतील का परतुन आमचे साजिद सर सांगा ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो. 8424043233

आजोबा

 *आजोबा....* आजोबा आणि नात म्हणजे दिवा आणि वात आपुलकीचा निर्मळ झरा जणू हृदयाच्या आत प्रथम आपले पुण्यस्मरण अन तारीख आजची बारा पुन्हा तुमच्या कुशीत अण्णा या नातवंडांस मिळावा थारा या नात्यातील थोडा वेगळाच असतो गोडवा राग कधीच येत नाही आपण कितीही चिडवा उच्च विचार आणि राहणी असावी साधी हेच तर शिकवलं ना तुम्ही  आम्हा सोडून जाण्याआधी सामाजिक राजकीय क्षेत्रात आपण उमटवला वेगळाच ठसा काहीं केलं तरी पुन्हा आता नेता होणार नाही असा कोणाचं व्यक्तिमत्त्व हे असंच नसतं ठरतं रिकाम्या हाती कधीच कुणी इथून गेला नाही परत तुमच्या आठवणींनी आज प्रत्येक हृदयास फुटेल पाझर मनास सारखे वाटत राहते आपण आमच्यात असता जर अंगाखांद्यावरच झालो तुमच्या आम्ही लहानाचे मोठे आठवण आपली प्रत्येक क्षणी आपणास आता शोधावे कुठे न्यायानेच वागलात आपण  आणि न्यायासाठीच लढला दोन घास खाऊन जा अण्णा नातवंडांनी पान जो वाढला ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी