भावपूर्ण श्रद्धांजली सर जी


 गडचिरोली येथे कार्यरत असलेले महाराष्ट्राचे एक उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून नावलौकिक मिळविलेले 

आदरणीय *साजिद अली खान सर यांना खाकी वर्दीतील दर्दी कवीकडून*

*ही शब्दरूपी श्रद्धांजली..💐💐*


*भावपूर्ण श्रद्धांजली सर जी*


ज्यांच्या अचानक जाण्याने

पोलीस दलास बसला धक्का

साजिद खान सर म्हणजे 

मैदानावरील हुकमी एक्का


पोलीस पदक राष्ट्रपती पदक

पदकांचा वेगळाच साज होता

कालपर्यंत होते ते आपल्यात

मात्र दुर्दैवी किती आज होता


मॅप रिडींगचे होते त्यांना

ज्ञान ही  सखोल तितकेच

सोडून जाऊ नयेत अशी माणसे

बस म्हणणे आहे इतकेच


उत्तम प्रशिक्षक म्हणून आज

त्यांची महाराष्ट्रभर ख्याती आहे

काय सांगू उरात आमच्या

आज दुःख साचले किती आहे


आसवांनी द्यावी सलामी

अन हृदयाचा व्हावा तिरंगा 

पुन्हा येतील का परतुन

आमचे साजिद सर सांगा

✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

अजय दत्तात्रय चव्हाण

खाकी वर्दीतील दर्दी कवी

मो. 8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत