आजोबा

 *आजोबा....*


आजोबा आणि नात

म्हणजे दिवा आणि वात

आपुलकीचा निर्मळ झरा

जणू हृदयाच्या आत


प्रथम आपले पुण्यस्मरण

अन तारीख आजची बारा

पुन्हा तुमच्या कुशीत अण्णा

या नातवंडांस मिळावा थारा


या नात्यातील थोडा

वेगळाच असतो गोडवा

राग कधीच येत नाही

आपण कितीही चिडवा


उच्च विचार आणि

राहणी असावी साधी

हेच तर शिकवलं ना तुम्ही 

आम्हा सोडून जाण्याआधी


सामाजिक राजकीय क्षेत्रात

आपण उमटवला वेगळाच ठसा

काहीं केलं तरी पुन्हा आता

नेता होणार नाही असा


कोणाचं व्यक्तिमत्त्व हे

असंच नसतं ठरतं

रिकाम्या हाती कधीच कुणी

इथून गेला नाही परत


तुमच्या आठवणींनी आज

प्रत्येक हृदयास फुटेल पाझर

मनास सारखे वाटत राहते

आपण आमच्यात असता जर


अंगाखांद्यावरच झालो तुमच्या

आम्ही लहानाचे मोठे

आठवण आपली प्रत्येक क्षणी

आपणास आता शोधावे कुठे


न्यायानेच वागलात आपण 

आणि न्यायासाठीच लढला

दोन घास खाऊन जा अण्णा

नातवंडांनी पान जो वाढला

✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

अजय दत्तात्रय चव्हाण

खाकी वर्दीतील दर्दी कवी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत