जबाब
जबाब
मी फक्त बोलून जातो
माझ्या मनात काही नसतं
कागदावर आल्यावर मात्र
सगळंच गणित फसतं
कागदाला कागद अन
जबावावर जबाब असतो
अधिकाऱ्यांचा मात्र मग
वेगळाच रुबाब असतो
तू लिहून दे एकदा
असं होणार नाही पुन्हा
चूक छोटीशीच असते हो
पण वाटू लागतो गुन्हा
तुला जे सांगितलंय
फक्त तेवढंच बोल
इमानदारीला इथं
काडीचं नसतं मोल
जे चाललं होतं आधी
तेच आपलं बरं होतं
इथं खऱ्याचं खोटं अन
खोट्याचं खरं होतं
जिथं तत्वासाठी जेव्हा
स्वाभिमान विकला जातो
चूक कोणाचीही असो मग
शेवटी अंमलदारच शेकला जातो
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो.8424043233
टिप्पण्या