आत्महत्येचं येड...
मेरिटमध्ये म्हणे तो
एक मार्कांने हुकला
ठीक आहे हरला असशील
पण निर्णय तुझा चुकला
एका अपयशाने मित्रा
असा जीवावर का उठतो
हा आयुष्याचा प्रश्न तरी
कुठं भल्याभल्यांना सुटतो
अरे अपयश असतं पोरकं
अन यशाला हजार बाप
उगाच डोक्याला एवढा
करून घ्यायचा नाही ताप
जरी नाही मिळालं तुला
आयुष्यात जे हवंय
अपयश पाचविण्याची मित्रा
तू लावून घे सवय
अर्ध्यावरती असा तू
सोडू नको रे डाव
हरविण्या संकटाना
तू ताकद मनाची लाव
ज्यांनी जन्म दिला तुला
त्यांचे पांग तरी फेड
डोक्यातून काढून टाक बाबा
हे आत्महत्येचं येड
टिप्पण्या