बंड
बंड
जराशी लिखाणात मी
पडलो थोडासा थंड
शब्दांनी पुकारलं
माझ्याविरुद्ध बंड
म्हणे तू आम्हाला आता
कवितेत का नाही मांडत
बसले नां राव ते चक्क
माझ्याशीच भांडत
तूच लावली सवय आम्हाला
एका पंक्तीत बसायची
माझी बाराखडीची लेकरे
कवितांच्या कुशीत हसायची
आम्हाला अनोखं रूप दिलं
ते होते साहित्यिक संत साधु
तुझ्याही लेखणीत आहे
अशीच काहीशी जादू
तू गुंफत जा शब्दांना
कवितांच्या सुरेख माळेत
असले अनुभव मिळतात
फक्त आयुष्याच्या शाळेत
तुझ्या लेखणीच्या स्पर्शाने
आम्हा मिळते सोनेरी किनार
एक दिवस नक्कीच मित्रा
तू खूप मोठा कवी होणार
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
PSI अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो:8424043233
टिप्पण्या