तुझ्या दुनियेतील....


 तुझ्या दुनियेतील 

जो तो आहे इथे 
आपल्याच कामात व्यस्त
ही दुनिया झाली महाग
आपण मात्र स्वस्त

आपली किंमत या जगात
जरी असली कवडीमोल
आपण आपल्या मनाचा
जाऊ द्यायचा नाही तोल

विनाकारण हसून
जरी ते जिरवतील
पण तुझं आयुष्य
थोडीच ते ठरवतील

पदोपदी होईल
जरी अपमान तुझा
तुझ्या दुनियेतील
तूच आहेस राजा

कट कारस्थान करून
आयुष्य उध्वस्त करू पाहतील
पाठीमागे वाईट बोलून
तोंडावर गोड राहतील

हा सगळा आहे मित्रा 
जीवनसंघर्षाचाच एक भाग
कुठंवर ठेवणार मनात तू
स्वतःबद्दलच इतका राग

नैराश्यच्या वाळवंटात लपली
आशेची हिरवळ बघ
लोकं काहीही बोलतील रे 
तू जरा तूझ्या मनाप्रमाणे जग
✍️✍️✍️✍️✍️✍️
पोलीस उपनिरीक्षक 
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो :- 8424043233

टिप्पण्या

Digambar s pune म्हणाले…
खुप सुंदर👍👍
Unknown म्हणाले…
अगदी बरोबर
मस्त.....
अनामित म्हणाले…
अतिशय सुंदर लिहिले आहे भावा खूप खूप छान 👍👍👌👌👌💯👏👏👏

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत