पोस्ट्स

सप्टेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तिला आवडते...

 मित्रांनो आज जवळजवळ खूप दिवसातून मघाशी बसल्या बसल्या  नवीन काहीतरी सुचलं नक्कीच आवडेल ही कविता तुम्हांला.... 👍 *तिला आवडते* तिला आवडते पेरूची फोड मला मात्र तिचा स्वभाव गोड तिला आवडते पुरणाची पोळी मला मात्र तिची  राहणी साधी भोळी तिला आवडते पावसाची सर मन मात्र म्हणत तिच्यावरच मर तिला आवडतो पाकातील गुलाबजाम मला मात्र तीचे सुगरण काम तिला आवडतं  मनमोकळं जगायला आणि मला मात्र तिला आनंदी बघायला तिला आवडतात फुलपाखरांचे रंग मी मात्र  वेडा  तिच्या आठवणीत दंग तीला आवडतो गोड दहिभात मला मात्र राहायचंय  तिच्या हृदयाच्या आत ✍️✍️✍️✍️✍️✍️ पोलीस उपनिरीक्षक अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो:- 8424043233

कातरवेळ

 बसल्या बसल्या सहजच सुचलेली ही सुरेख अशी कविता.. *कातरवेळ* कातरवेळी होई मन उदास उदास निराशेला उदान अन  आनंदाचा ऱ्हास तिच्या आठवणी बोचाऱ्या डिवचतात मनाला आतल्या आत खळबळ सांगता येत नाही कुणाला कुठेच लागत नाही भोळे मन बिचारे कोण आहे रे तुझे खोचकपणे विचारे विचारांचा नुसता कल्लोळ माजतो मनी मन आपल सावरायला  हवं असतं कुणी चित्त नसते थाऱ्यावर अन जीव खायला उठतो कातरवेळीचा तिढा कुठं  भल्याभल्यांना सुटतो कुठं तरी गुंतवावं लागतं मन आवडीच्या छंदात तेव्हा कुठं पडत नाही ते असल्या विलक्षण फंदात ✍️✍️✍️✍️✍️✍️ पोलीस उपनिरीक्षक अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो:-8424043233

शब्द

 *आज शब्दांनीच मला प्रश्न केला* *नक्किच आवडेल आपणास* *माझी ही कविता...* शब्दांनीच आज मला असा केला प्रश्न गप्प बसून असं  अवसान आणू नको उसणं कुठे हरवल्या सांग तूझ्या रोजच्या कविता चारोळ्या आतूनच येऊ लागल्या माझ्या मनाच्या आरोळ्या आधी तर म्हणे तू रोज न चुकता पाठवायचा आमच्यासाठी  तू  स्वतःच रक्त ही आटवायचा तू तर बोलत होता म्हणे  शब्दच माझ्यावर रुसले  आपल्या दोघांमध्ये सांग हे वैर असले कसले आम्हीच तर शिकवली तुला कवितेची भाषा अन आजकाल तर तू पार सोडूनच दिलीस अशा अरे तू फक्त आम्हाला एकदा गोंजार प्रेमाने शिळामुक्त केले होते जसे  माता अहिल्येला रामाने लाडीवाळपणे आम्हाला जवळ तर घे कुरवाळून आम्हीही तुझ्यावर बघ कसा टाकतो जीव ओवाळून आज जे काही अस्तित्व आहे ते आमच्यामुळेच आहे तुझे समजू नको आम्हाला तू  तुझ्या मनावरचे ओझे ✍️✍️✍️✍️✍️✍️ पोलीस उपनिरीक्षक अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो:- 8424043233