कातरवेळ
बसल्या बसल्या सहजच सुचलेली
ही सुरेख अशी कविता..
*कातरवेळ*
कातरवेळी होई
मन उदास उदास
निराशेला उदान अन
आनंदाचा ऱ्हास
तिच्या आठवणी बोचाऱ्या
डिवचतात मनाला
आतल्या आत खळबळ
सांगता येत नाही कुणाला
कुठेच लागत नाही
भोळे मन बिचारे
कोण आहे रे तुझे
खोचकपणे विचारे
विचारांचा नुसता
कल्लोळ माजतो मनी
मन आपल सावरायला
हवं असतं कुणी
चित्त नसते थाऱ्यावर
अन जीव खायला उठतो
कातरवेळीचा तिढा कुठं
भल्याभल्यांना सुटतो
कुठं तरी गुंतवावं लागतं
मन आवडीच्या छंदात
तेव्हा कुठं पडत नाही ते
असल्या विलक्षण फंदात
✍️✍️✍️✍️✍️✍️
पोलीस उपनिरीक्षक
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो:-8424043233
टिप्पण्या