शब्द

 *आज शब्दांनीच मला प्रश्न केला*

*नक्किच आवडेल आपणास*

*माझी ही कविता...*


शब्दांनीच आज मला

असा केला प्रश्न

गप्प बसून असं 

अवसान आणू नको उसणं


कुठे हरवल्या सांग तूझ्या

रोजच्या कविता चारोळ्या

आतूनच येऊ लागल्या

माझ्या मनाच्या आरोळ्या


आधी तर म्हणे तू

रोज न चुकता पाठवायचा

आमच्यासाठी  तू 

स्वतःच रक्त ही आटवायचा


तू तर बोलत होता म्हणे 

शब्दच माझ्यावर रुसले 

आपल्या दोघांमध्ये सांग

हे वैर असले कसले


आम्हीच तर शिकवली

तुला कवितेची भाषा

अन आजकाल तर तू पार

सोडूनच दिलीस अशा


अरे तू फक्त आम्हाला

एकदा गोंजार प्रेमाने

शिळामुक्त केले होते जसे 

माता अहिल्येला रामाने


लाडीवाळपणे आम्हाला

जवळ तर घे कुरवाळून

आम्हीही तुझ्यावर बघ कसा

टाकतो जीव ओवाळून


आज जे काही अस्तित्व आहे

ते आमच्यामुळेच आहे तुझे

समजू नको आम्हाला तू 

तुझ्या मनावरचे ओझे

✍️✍️✍️✍️✍️✍️

पोलीस उपनिरीक्षक

अजय दत्तात्रय चव्हाण

खाकी वर्दीतील दर्दी कवी

मो:- 8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत