जनता
*जनता....* संपली निवडणूक उधळला गुलाल जिंकणाऱ्यांची चांदी हरणाऱ्यांचे हाल अंदाज सगळेच ठरले फोल कुणाची सरशी तर कुणाला कौल प्रचाराची रणधुमाळी आश्वासानांची खैरात फोडाफोडीच्या गोंधळात जनता झाली सैराट पक्षांची फोडाफोड चिन्हाची पळवापळवी सत्तेच्या लालसेपोटी मताची जुळवाजूळवी कोणाची प्रतिष्ठा पणाला तर कोणाचा स्वाभिमान गहाण लोकशाही राज्यात शेवटी जनता हीच महान ✍️✍️✍️✍️✍️✍️ पोलीस उपनिरीक्षक अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो:- 8424043233