नातं भावा भावाचं

 *नातं भावा-भावाचं....*


हसत हसत द्यायचा तो

अगदी घासतला पण घास

असा कसा उडाला मग

एकमेकांवरचा विश्वास


लहानपणी भावासाठी जो

आयुष्य आला हरत

एकमेकांची डोकी फोडायलाही 

ते कमी नाही करत


त्यालाच होती काळजी कधी 

भावाच्या फाटक्या शर्टाची 

तोच चढतो इस्टेटीसाठी

शेवटी पायरी कोर्टाची


निरागस त्यांच्या डोळ्यात

प्रतिशोधाची पेटते आग

सगळं संपून गेल्यावरच मग 

दोघांनाही येते जाग


नातं रक्ताचं असूनही ते

एकमेकांचं रक्त शोषतात 

तुम्हीच सांगा भावाभावांची नाती 

अशी थोडीच असतात 


जन्म घेऊन देखील

एकाच आईच्या पोटी

आयुष्यभर कोरी राहते

त्यांच्या आपुलकीची पाटी


मदतीला धावणारा तो

मयतीला सुद्धा जात नाही

म्हणून म्हणतो आयुष्य कुणाचं

कुणावचून ही राहत नाही

✍️✍️✍️✍️✍️✍️

पोलीस उपनिरीक्षक

अजय दत्तात्रय चव्हाण

खाकी वर्दीतील दर्दी कवी

Mo:- 8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत