पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कवी कलश

इमेज
 *कवी कलश.....* जगतानाच नाही तर तो  मरताना ही साथ देतो  विझणाऱ्या दिव्याची  काव्यरूपी वात होतो  कितीही भयाण असुद्या हो  त्या मुरदाड मरणाचं रूप  कवीच्या शब्दात म्हणे  ताकद असते खूप  कृष्ण सुदामाचीच फक्त  आम्ही आलो उदाहरणे ऐकत  कवी कलश राजांच्या मैत्रीपुढे  तो मृत्यू ही नव्हता झुकत  निष्ठा काय असते हे  शब्दात सांगणे अवघड  मित्रासोबत जिंकला त्यांनी  क्रूर मृत्यूचा ही गड  मरणयातना सहन करत दोघे  होते मरणाशी झुंजत  तरीदेखील कविता त्याची होती गनिमांच्या कानात गुंजत रक्तरंजित देह जरी जिव्हा गात होती राजांच गुणगान  असा कवी कलश आमचा  स्वराज्यात होऊन गेला महान ✍️✍️✍️✍️✍️✍️ पोलीस उपनिरीक्षक  अजय दत्तात्रय चव्हाण  खाकी वर्दीतील दर्दी कवी  Mo:- 8424043233
 *धुंदी......* छोट्या छोट्या गोष्टींना  खूपच घेतलं मनावर विरोध केला कोणी  आणि रागावलो कोणावर वड्याचं तेल वांग्यावर  ही चुकीचीच आहे रीत आपणच ठरवायचं आता  आपलं कशात आहे हीत  मी खचलो की त्यांच्या मनाच्या  मोठेपणाचं दर्शन मला घडायचं  चार लोकांसाठी विनाकारण  चारशेंना का सोडायचं   कला म्हणजे असतो जणू  अस्सल सातारी पेढा कंदी सोनं करणारच एक दिवस  फक्त मिळूद्या मला संधी जोपर्यंत चालू राहील माझ्या हृदयातील श्वास तोपर्यंत धरणार मी  माझ्या सुंदर कलेचा ध्यास ✍✍✍✍✍ पोलीस उपनिरीक्षक  अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो:- 8424043233

उनाडपणा

इमेज
  *उनाडपणा.......* अशा घटना ऐकल्या की  काळजात होऊन जातं चरर  का कळत नाही पोरांना  आपल्यालाही आहे घर दुश्मनावर ही येऊ नये  अशी वेळ त्यांच्यावर आली  घरच्यांचा मात्र काळजीने  होतो जीव वर खाली सावकाश जा बाळा  नेहमी सांगत असते आई  का माहित तरीही बाळाला   इतकी कशाची असते घाई  कितीही सांगितलं पोटतिडकीने तरी  ते धरतात वेगाची आस  त्यांच्या काळजीने आई बापाचा आतल्या आत गुदमरतो श्वास उनाडपणा असा  त्यांच्या आला अंगलट जिवंत उदाहरणे डोळसमोर तरी  त्यांना का नाही कळत  एका क्षणात होऊन जातं  होत्याच नव्हतं  असं थोडीच कुणाला  कोणाचं नशीब घावतं  हसतं खेळतं घर  दुःखात जातं बुडून  जीवापाड जपलेलं लेकरू   जेव्हा जग जातं सोडून बहिणीचा तो आक्रोश  अन आई फोडते हम्बरडा  त्याच्या पाऊल खुणांना मुकतो  कायमचाच उंबरठा कितीही केला आटापिटा तरी  तो थोडीच येणार आहे परत  दुःख असतं डोंगराएवढं अन  हे आयुष्य ही नाही सरत ✍️✍️✍️✍️✍️✍️ पोलीस उपनिरीक्षक  अजय दत्तात्रय चव्हाण...