*धुंदी......*
छोट्या छोट्या गोष्टींना
खूपच घेतलं मनावर
विरोध केला कोणी
आणि रागावलो कोणावर
वड्याचं तेल वांग्यावर
ही चुकीचीच आहे रीत
आपणच ठरवायचं आता
आपलं कशात आहे हीत
मी खचलो की त्यांच्या मनाच्या
मोठेपणाचं दर्शन मला घडायचं
चार लोकांसाठी विनाकारण
चारशेंना का सोडायचं
कला म्हणजे असतो जणू
अस्सल सातारी पेढा कंदी
सोनं करणारच एक दिवस
फक्त मिळूद्या मला संधी
जोपर्यंत चालू राहील
माझ्या हृदयातील श्वास
तोपर्यंत धरणार मी
माझ्या सुंदर कलेचा ध्यास
✍✍✍✍✍
पोलीस उपनिरीक्षक
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो:- 8424043233
टिप्पण्या