उनाडपणा
*उनाडपणा.......*
अशा घटना ऐकल्या की
काळजात होऊन जातं चरर
का कळत नाही पोरांना
आपल्यालाही आहे घर
दुश्मनावर ही येऊ नये
अशी वेळ त्यांच्यावर आली
घरच्यांचा मात्र काळजीने
होतो जीव वर खाली
सावकाश जा बाळा
नेहमी सांगत असते आई
का माहित तरीही बाळाला
इतकी कशाची असते घाई
कितीही सांगितलं पोटतिडकीने तरी
ते धरतात वेगाची आस
त्यांच्या काळजीने आई बापाचा
आतल्या आत गुदमरतो श्वास
उनाडपणा असा
त्यांच्या आला अंगलट
जिवंत उदाहरणे डोळसमोर तरी
त्यांना का नाही कळत
एका क्षणात होऊन जातं
होत्याच नव्हतं
असं थोडीच कुणाला
कोणाचं नशीब घावतं
हसतं खेळतं घर
दुःखात जातं बुडून
जीवापाड जपलेलं लेकरू
जेव्हा जग जातं सोडून
बहिणीचा तो आक्रोश
अन आई फोडते हम्बरडा
त्याच्या पाऊल खुणांना मुकतो
कायमचाच उंबरठा
कितीही केला आटापिटा तरी
तो थोडीच येणार आहे परत
दुःख असतं डोंगराएवढं अन
हे आयुष्य ही नाही सरत
✍️✍️✍️✍️✍️✍️
पोलीस उपनिरीक्षक
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो:- 8424043233
टिप्पण्या