प्रेम करावं तिच्या..............
प्रेम करावं तिच्या
मादक पाणीदार डोळ्यावर
मधुर सुरात गाणाऱ्या
कोकिळेच्या गळ्यावर
प्रेम करावं तिच्या
नाजूक कोमल ओठावर
झुळझुळ वाहणाऱ्या
शेतातील पाटावर
प्रेम करावं तिच्या
बारीकश्या नक्षीदार बिंदिवर
पाखरू गात असलेल्या
आंब्याच्या फांदीवर
प्रेम करावं तिच्या
हळव्या चेहऱ्यावर
सैरभैर वाहणाऱ्या
उनाड वाऱ्यावर
प्रेम करावं तिच्या
काळ्याभोर लांबलचक केसावर
सुगंधाने भारलेल्या
मोगऱ्याच्या वासावर
प्रेम करावं तिच्या
मूर्तिमंत सौन्दर्यावर
लाटांच गीत गाणाऱ्या
अथांग दर्यावर
प्रेम करावं तिच्या
सरळ नाकाच्या दांडीवर
निसर्गाच्या कुशीत अन
गवताच्या मांडीवर
अजय द चव्हाण
उर्फ (राहूल)
*खाकी वर्दीतला दर्दी कवी*
मोबाईल नंबर 8424043233
टिप्पण्या
खूप सुंदर
अप्रतिम..!!
👌👌👌👌👌👌