दुनियेची रीत
*दुनियेची रीत*
जिंकून सुद्धा कधी कधी
नियतीपुढं हरावं लागत
गुन्हा नसताना ही कधी कधी
आपल्याला दोषी ठराव लागतं
मागूनही मिळत नाही अन
हिसकावून ही घेता येत नाही
पेरावा जीवनात आनंद जरासा
असे सुपीक कुठे शेत नाही
आपलंच खरं म्हणणाऱ्यांच्या
दुनियेत सत्य मात्र टिकत नाही
आपल्याला सल्ले देणाऱ्यांचे
मात्र कधीच चुकत नाही
समजावून सांगता सांगता
आपल्या डोक्याचं होत भरीत
चांगल्या गोष्टींची टर उडविणे
हीच तरी खरी दुनियेची रीत
जाराश्या गोष्टीने आजकाल
ही दुखावली जातात मनं
समजून घेणारं कोण नसत म्हणून
आतून घुसमटत हे जिणं
ओरडून ओरडून सांगूनही
समोरच्याला समजत नाही
म्हणूनच आजकाल सहसा
कुणाशी माझं जमतं नाही
✍✍✍✍✍✍
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो.8424043233
टिप्पण्या