तुझी आठवण कधी
तुझी आठवण कधी.......
तुझी आठवण कधी
पुनवेची रात होते
आवडीने खावा असा
गोड दहीभात होते
तुझी आठवण कधी
नाजूक वेलीवरची कळी होते
आकाशाच्या गालावर उमटलेली
चांदण्यांची खळी होते
तुझी आठवण कधी
स्वप्नामागे धावणाऱ्या मनघोड्याची नाल होते
थंडीत लपेटून घ्यावी अशी
उबदार शाल होते
तुझी आठवण कधी
दुधावरची साय होते
बोट धरून चालावी अशी
गोंडस लेकराची माय होते
तुझी आठवण कधी
समींदराची लाट होते
दाटून आलेल्या हुंदक्याची
अश्रूरूपी वाट होते
तुझी आठवण कधी
दूत बनून येते
विरहात जळणाऱ्या मनाला
क्षणभर सुखावून जाते
अजय द. चव्हाण
उर्फ (राहुल)
*खाकी वर्दीतला दर्दी कवी*
मो. नं. 8424043233
टिप्पण्या