बर्फाच्या गादीखाली दडपला जरी देह...





         हनुमंतप्पा हे प्रत्येक काळजाचा ठोका चुकविलेल्या हिमस्खलनात शहीद झालेल्या जवानाचे नाव

या शूरविरास माझ्या या कवितेमधून भावपूर्ण आदरांजली
जय हिंद

                  बर्फाच्या गादीखाली दडपला जरी देह

बर्फाच्या गादिखाली
दडपला जरी देह
आवरत नाही ना हा
देशसेवेचा मोह

हे भारत माते तू घेतलंस
तुझ्या कुशीत सामावून
शाहिद म्हणून झालो अमर 
कोण घेईल हिरावून

तुझ्या थरथरत्या हाताचा आई
नाही आता नशिबी घास
या हिमाच्छादित पदराखाली
गुदमरतोय ना श्वास


ताईच्या डोळ्यातील आता
कोण पुसेल अश्रू
आईसारखीच मयाळू ती
मी कसा विसरू

तिरंग्यामध्ये लपेटण्याचं
भाग्यचं असतं निराळं
सलाम भारत मातेला
जे माझ्या नशिबी मिळालं

नाही झालो महात्मा
 नाही झालो संत
फक्त शहीद म्हणून राहुद्या
तुमच्या हृदयात जिवंत


*अजय द चव्हाण*
उर्फ (राहुल)
*खाकी वर्दीतला दर्दी कवी*
8424043233

टिप्पण्या

Tap`s म्हणाले…
खुप छान कविता लिहिता आपण
Unknown म्हणाले…
Khup sunder sir 👌👌👌👌👌

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत